Pune News : पुणे, : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग आणि अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या वडिलांची शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी पित्यावर भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी (पीडितेची आई) यांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी वाकड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीनुसार, त्या कामावर गेल्या असताना आरोपीने पीडित मुलीला मारहाण केली होती. मुलीकडे विचारपूस केली असता, आरोपीने सहा महिन्यांपासून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मुलीने सांगितले होते. Pune News
या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता. हे प्रकरण विशेष न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एम. टाकळीकर यांच्या न्यायालयात चालवण्यात आले. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे पीडिता, तिची आई, तपासी अधिकारी आणि इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. Pune News
आरोपीच्या वतीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी बाजू मांडली. त्यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली आणि अंतिम युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीविरुद्ध सबळ आणि ठोस पुरावा उपलब्ध नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेतले. Pune News
दरम्यान, सरकार पक्षाला आरोपीविरुद्धचे दोषारोप सिद्ध करता आले नाहीत. केवळ आरोपांच्या आधारे गुन्हा सिद्ध होऊ शकत नसल्याचे नमूद करत न्यायालयाने खालेद बेग याची या प्रकरणातून मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीला ॲड. स्वप्नील दाभाडे आणि ऋषिकेश पाटील यांनी कायदेशीर सहकार्य केले. Pune News







