Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 April 2026, 12:07

Hadapsar News लोणी काळभोर, ता. 28 : क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून एजंटांकडून थेट रस्त्यावर गुंडगिरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पंधरा नंबर चौकात तीन वसुली एजंटांनी एका नागरिकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. 27) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हडपसर पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित झाले आहेत. Hadapsar News

संदीप जामदार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे या तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी क्रेडिट कार्ड कंपनीचे हे तिघे वसुली एजंट थकबाकी वसूल करण्यासाठी जामदार यांना पंधरा नंबर चौकात अडवले. यावेळी वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. Hadapsar News

संबंधित एजंटांनी जामदार यांना भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी त्यांच्यासोबत असलेली महिला हात जोडून “मारहाण करू नका” अशी विनंती करत होती; मात्र एजंटांनी तिचीही पर्वा न करता शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढा गंभीर प्रकार घडूनही हडपसर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे “भररस्त्यात मारहाण करूनही फक्त अदखलपात्र गुन्हा?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या कारवाईमुळे एजंटांना पोलिसांकडून एकप्रकारे मोकळीक मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटनांत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Hadapsar News

या घटनेदरम्यान एजंटांकडून “चला पोलीस ठाण्यात, दाखवतो” अशा धमक्या दिल्याचाही आरोप समोर आला आहे. त्यामुळे पोलिस आणि वसुली एजंट यांच्यात संगनमत तर नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.भरदिवसा घडलेल्या या घटनेने कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले असून, “गुंडगिरीला पाठीशी घालणारे कोण?” हा सवाल आता अधिक तीव्र झाला आहे. Hadapsar News

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग, मारहाण व धमकी यांसारख्या गंभीर बाबी असतानाही भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. Hadapsar News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.