Akrudi Bribe पुणे, ता. २ : आरटीई (Right to Education) अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ४० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आकुर्डी (पुणे) येथील फकीर भाई पानसरे पिंपरी चिंचवड उर्दू प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर 30 एप्रिलला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. Akrudi Bribe

ज्ञानेश्वर उर्फ माऊली गंगाराम जगताप (वय ३७, रा. नंदनवन कॉलनी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. Akrudi Bribe
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीस आर.टी.ई. अंतर्गत अॅडमिशन घेण्याकरिता ऑनलाइन फॉर्म भरला होता. सदर फॉर्मची पडताळणी करण्यासाठी ते फकीर भाई पानसरे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा आकुर्डी येथे गेले होते. तेव्हा त्यांना अर्ज रिजेक्ट झाल्याबाबत सांगण्यात आले. तेथे त्यांची भेट ईसम नामे माऊली गंगाराम जगताप यांच्याशी झाली. त्यांनी तक्रारदार यांच्या मुलीचे अॅडमिशन करून पडताळणी फॉर्म ची रिसीट देण्याकरिता 40 हजार रुपये लाच द्यावी लागेल. असे सांगितले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. Akrudi Bribe
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता,आरोपी इसम ज्ञानेश्वर उर्फ माऊली गंगाराम जगताप यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीचे आरटीई एप्लीकेशन पडताळणीची रिसिट देण्यसाठी तडजोडी अंती 40 हजार रुपयांची लाच मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे तपासात निष्पन्न झाले. Akrudi Bribe
त्यानंतर एसीबीने फकीर भाई पानसरे पिंपरी चिंचवड उर्दू प्राथमिक शाळा खंडोबा माळ आकुर्डी पुणे येथे सापळा रचला. यावेळी आरोपी खाजगी इसम ज्ञानेश्वर उर्फ माऊली गंगाराम जगताप यांना तक्रारदार यांच्याकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे करत आहेत. Akrudi Bribe







