Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : दारूच्या वादातून मजुराचा दगडाने ठेचून खून, कोंढवा पोलिसांकडून आरोपी जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 13:53
duaghter murdered her mother with help of friend pune

Pune Crime पुणे, ता. 2 : किरकोळ वादातून घडलेल्या संतापजनक घटनेत एका मजुराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात उघडकीस आली आहे. दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून केटरिंग कामगाराने दगडाने डोक्यात वार करून तरुणाची हत्या केली. ही घटना ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते रात्री साडेअकराच्या दरम्यान आर.के. कॉलनी परिसरातील टेकडीजवळ कडुलिंबाच्या झाडाखाली घडली. कोंढवा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. Pune Crime

मनिषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. पंचशीलनगर, कोंढवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर महादेव अर्जुन कांबळे (वय ३५, रा. स्वामी समर्थनगर, कात्रज-कोंढवा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune Crime

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषकुमार पासवान हा टेकडी परिसरात एकटाच बसून दारू पित होता. त्यावेळी आरोपी महादेव कांबळे तेथे आला आणि त्याने दारू मागितली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात कांबळे याने जवळच असलेला मोठा दगड उचलून पासवानच्या डोक्यात जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात पासवानचा जागीच मृत्यू झाला. Pune Crime

घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला. मात्र त्याने आपल्या भावाला घडलेला प्रकार सांगितल्याने पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई आणि पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक करांडे करीत आहेत. Pune Crime

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार; अल्पवयीन चालकाकडून १७ दुचाकींची चक्काचूर, कार मालकावर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.