Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 2 May 2026, 11:41

Pune police Bribe News पुणे, ता. २ : अदखलपात्र गुन्ह्यात मदत केल्याच्या कारणावरून तसेच पुढील काळात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोहगाव पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (ता. १) सायंकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास लोहगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. या घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. Pune police Bribe News

मनोज मधुकर बरुटे (वय ३८, पद – पोलीस उपनिरीक्षक, वर्ग २, लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर; रा. रूम क्र. ६०१, गंगा कळस सोसायटी, कळस-धानोरी, पुणे) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा जमिनीचा व्यवसाय असून त्यांच्या विरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र (N.C.) गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच पुढेही मदत करण्यासाठी आरोपी उपनिरीक्षक बरुटे यांनी तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.

 

तक्रारीची पडताळणी करताना आरोपीने स्वतःसाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे पंचांसमक्ष स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून बरुटे यांना तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. Pune police Bribe News

दरम्यान, आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर लोहगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post
two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.