Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ शब्दाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 26 November 2024, 18:59
Broken relationships don't automatically amount to abetment of suicide Supreme Court

नवी दिल्ली: भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडत्व’ हे शब्द जोडणाऱ्या १९७६ च्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावल्या आहेत. प्रस्तुत याचिकांवर विस्तृत सुनावणी करण्याची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना केराची टोपली दाखवली.

 

सरन्यायाधीश संजीव खन्ना व न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी, वरिष्ठ वकील विष्णू शंकर जैन व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर गेल्या २२ नोव्हेंबर रोजी आपला फैसला राखीव ठेवला होता. संविधानातील प्रस्तावनेत ‘समाजवादी’ व ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द सामील करण्यास या सर्वांनी आव्हान दिले होते.

आपला युक्तिवाद करीत याचिकाकर्ते विष्णुकुमार जैन यांनी ९ न्यायमूर्तीच्या घटनापीठाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला. राज्यघटनेतील कलम ३९ (ब) वर ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ शब्दाच्या व्याख्येवर असहमती दर्शवली होती, अशी व्याख्या माजी न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर व न्या. ओ. चिन्नप्पा रेड्डी यांनी ठरवली होती, असे जैन म्हणाले. त्यावर खंडपीठाने म्हटले की, प्रस्तुत याचिकांवर विस्तृत सुनावणी करण्याची आवश्यकता नाही.

‘समाजवादी’ व ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द १९७६ मध्ये घटनादुरुस्तीच्या माध्यमातून जोडण्यात आले होते. त्यामुळे १९४९ रोजी संविधान स्वीकारण्यात आले. या तथ्यामुळे प्रस्तावनेवर काहीही परिणाम होत नाही, असे खंडपीठाने नमूद केले आहे. जर यापूर्वीच्या प्रकरणांमधील युक्तिवाद स्वीकारला तर तो सर्वच दुरुस्त्यांवर लागू होईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

उल्लेखनीय बाब अशी की, १९७६ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ वी घटनादुरुस्ती करून संविधानाच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी व धर्मनिरपेक्षता व अखंडत्व’ हे शब्द समाविष्ट केले होते. या घटनादुरुस्तीनंतर प्रस्तावनेत भारताचे स्वरूप ‘सार्वभौम, प्रजासत्ताक गणराज्य’ बदलून ते ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य’ असे झाले होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारभार उघड; ‘अंगठी’च्या नावाखाली लाखोंची लूट, ‘SIT’ च्या हाती ठोस पुरावे

Tuesday, 28 April 2026, 17:35

Junnar Pond Drowning : जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू..

Tuesday, 28 April 2026, 17:33

Pune Crime News : पुण्यात बंगल्यातच ‘गांजा शेती’चा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 28 April 2026, 17:26
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

Tuesday, 28 April 2026, 17:23

Baramati News : बारामतीतील एमआयडीसी रोडवरील बेकायदा अड्ड्यांचा पर्दाफाश ; वैभव वाईन्सला नोटीस तर अंडा भुर्जी व चिकन सेंटर चालकांसह चौघांवर गुन्हे दाखल

Tuesday, 28 April 2026, 17:16

Yavat Crime : यवत पोलीस ठाणे अवैध धंद्यांत जिल्ह्यात अग्रेसर..? देहविक्री, मटका, हातभट्टी, वाळू तस्करीला संरक्षण?

Tuesday, 28 April 2026, 16:44
Next Post

खळबळजनक...! पिंपरीत कुऱ्हाडीने हत्या करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर; पोलिसही चक्रावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.