Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Crime : यवत पोलीस ठाणे अवैध धंद्यांत जिल्ह्यात अग्रेसर..? देहविक्री, मटका, हातभट्टी, वाळू तस्करीला संरक्षण?

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 April 2026, 16:44

Yavat Crime लोणी काळभोर, ता. 28 : यवत (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, हातभट्टी, अवैध वाळू उपसा, गुटखा विक्री आणि वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या अवैध धंद्यांना कथित संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. परिणामी, यवत पोलीस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. Yavat Crime

गोटू पवार व नवाज तांबोळी यांचे यवत, खामगाव गाडीमोडी, बोरीऐंदी आणि सहजपूर येथे मटक्याचे अड्डे असल्याचे सांगितले जाते. तसेच, केडगाव चौफुला येथे रमेश मारकड, केडगाव व बोरी पार्धी येथे गफुरभाई शेख, देलवडी-पिंपळगाव येथे निखिल दोरगे, राहू येथे संतोष भोसले आणि पाटस येथे राजू भंडलकर यांच्या नावांची चर्चा मटका व्यवसायाशी संबंधित म्हणून होत आहे. या भागांत मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असून, काही व्यक्तींमार्फत नियमित आर्थिक व्यवहार होत असल्याचे बोलले जाते. Yavat Crime

यवत परिसरात तब्बल 12 ठिकाणी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये यवत येथे 2, शेलारवाडी येथे 2, लडकतवाडी-नाथाचीवाडी येथे 2, भांडगाव येथे 1, सहजपूर येथे 3 आणि नांदूर येथे 2 अशा हातभट्ट्या दिवसरात्र सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकारांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. Yavat Crime

 

दरम्यान, भांडगाव-खोर पट्ट्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे सांगितले जाते. डाळिंब, ताम्हणवाडी, कासुर्डी-भरतगाव आणि खोर या भागांतून बेकायदेशीर उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे. या धंद्यातूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिक वसुली होत असल्याची चर्चा आहे. याशिवाय, गुटखा विक्रेते, भंगार व्यावसायिक तसेच कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांकडूनही नियमित वसुली केली जात असल्याचे बोलले जाते. Yavat Crime

बोरी भडक, वखारी, वाकडा पूल, गार आणि चौफुला ही ठिकाणे देहविक्रीची केंद्रे बनल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय सुरू असून, त्याकडेही पोलिसांकडून डोळेझाक होत असल्याचे आरोप आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक अवैध धंदे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असल्याचे चित्र समोर येत असून, पोलिसांकडून केवळ किरकोळ कारवाया करून गाजावाजा केला जातो, मात्र मोठ्या धंद्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची टीका होत आहे. या सर्व प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “यवत पोलीस ठाणे नेमके कोणासाठी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. Yavat Crime

लाखोंची माया नेमकी कोणाच्या घशात?

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने विविध प्रकारचे धंदे खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. या अवैध व्यवसायांमधून दरमहा सुमारे 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत ‘मोहमाया’ गोळा केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे ही मोठी रक्कम नेमकी कोणाकडे आणि कशा पद्धतीने पोहोचते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी! नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात; महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता

Saturday, 13 June 2026, 20:57

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13
Next Post

Baramati News : बारामतीतील एमआयडीसी रोडवरील बेकायदा अड्ड्यांचा पर्दाफाश ; वैभव वाईन्सला नोटीस तर अंडा भुर्जी व चिकन सेंटर चालकांसह चौघांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.