पुणे, ता. 28 : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात Ashok Kharat प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती धक्कादायक पुरावे लागले असून, त्याच्या कथित फसवणुकीच्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश झाला आहे. सातव्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ‘एसआयटी’ने खरातच्या ‘ओकस’ कार्यालयावर छापा टाकत महत्त्वाचे साहित्य आणि एक कोरा धनादेश जप्त केला आहे. Ashok Kharat

झडतीदरम्यान तपास पथकाला स्टीलच्या कडीमध्ये अडकवलेली अंगठ्यांची तब्बल 35 मोजमापे सापडली. तपासात उघड झाले की, खरात भाविकांच्या बोटांचे माप घेऊन त्यांना ‘विशेष शक्ती’ असलेल्या अंगठ्या घालण्याचा सल्ला देत असे. बाजारात सुमारे 5 हजार रुपयांना मिळणाऱ्या अंगठ्या तो भाविकांना लाखो रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. Ashok Kharat
याशिवाय, एका महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेशही पोलिसांनी जप्त केला आहे. पूजाविधी आणि समस्या निवारणाच्या नावाखाली खरात भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले होते. धार्मिक विधी, दैवी शक्ती आणि अंधश्रद्धेचा आधार घेत तो महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे तपासात समोर आले आहे. अंगठ्या आणि पूजाविधींचा वापर करून तो पीडितांवर प्रभाव टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे. Ashok Kharat
एसआयटीने जप्त केलेले हे पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार असून, नाशिक पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे. तसेच, या प्रकारे फसवणूक झालेल्या इतरांनीही पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Ashok Kharat







