Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : कापूरहोळमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर; कारवाईनंतर नागरिक–प्रशासन आमनेसामने

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 April 2026, 18:53

विशाल शिंदे
Bhor News नसरापूर, ता. 28 : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे पुणे–सातारा सहापदरीकरण महामार्गालगत उभारलेल्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी (ता. 27) धडक कारवाई करत सेवा रस्त्यालगतची अनेक बांधकामे जमीनदोस्त केली. मात्र या कारवाईनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला असून, नुकसानभरपाई व कायदेशीर प्रक्रियेवरून वाद चिघळला आहे. Bhor News

कापूरहोळ गावातील नारायणपूरकडे जाणाऱ्या चौकाजवळ सेवा रस्त्यालगत हॉटेल, दुकाने व विविध व्यावसायिक आस्थापनांनी अतिक्रमण केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेवर ही बांधकामे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधितांना यापूर्वी अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला. Bhor News

सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता पोकलेन, दोन जेसीबी, क्रेन, गॅस कटर, हायवा डंपर आणि सुमारे 25 पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायणपूर रस्त्यालगतच्या हॉटेल्स व शेड्सवर कारवाई करण्यात आली असून, महामार्गाच्या मध्यापासून 30 मीटरपर्यंतच्या अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात आला. Bhor News

 

दरम्यान, या कारवाईला काही ठिकाणी स्थानिकांकडून तीव्र विरोध झाला. कापूरहोळ येथील मधुकर उकिरडे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मालमत्तेवर झालेल्या कारवाईविरोधात आक्षेप नोंदवत, योग्य नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय कारवाई मान्य नसल्याची भूमिका घेतली. 1981 च्या संपादन प्रक्रियेनुसार अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा त्यांचा दावा आहे. Bhor News

या पार्श्वभूमीवर  वनश्री सोमनाथ उकिरडे यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मौजे कापूरहोळ येथील गट क्रमांक 7/3 मधील वडिलोपार्जित मालमत्तेचे कोणतीही पूर्वसूचना न देता नुकसान करण्यात आले. 27 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 4.30 वाजता यंत्रसामग्रीसह आलेल्या पथकाने कारवाई करत अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करूनही जमीन अधिग्रहण, संयुक्त मोजणी अहवाल किंवा नुकसानभरपाईबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. घटनेच्या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. Bhor News

दरम्यान, ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुभाष घंटे, लक्ष्मण पाटील, पीएस टोल रोडचे अभिजित गायकवाड तसेच पोलीस अधिकारी तुकाराम राठोड यांच्या उपस्थितीत पार पडली. या घटनेमुळे कापूरहोळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Bhor News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

Daund News : धक्कादायक..! कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय मातेचा मृत्यू ; केडगाव आरोग्य केंद्रातील प्रकार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकले पोरके झाल्याचा नातेवाईकांचा आरोप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.