Pune News : पुणे, ता. 28 : लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका तरुणीचा सातत्याने पाठलाग करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. “तू माझी नाही झालीस, तर तुला कुणाचीही होऊ देणार नाही,” अशी धमकी देत आरोपीने तिचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. Pune News

या प्रकरणी ३० वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने वारंवार तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास दिला. इतकेच नव्हे, तर तिच्या घरात घुसून मारहाण केल्याचाही आरोप आहे. Pune News
“तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही,” अशा स्वरूपाच्या धमक्या देत आरोपीने भीतीचे वातावरण निर्माण केले.तसेच आरोपीने पीडितेच्या आईलाही शिवीगाळ केली असून, वारंवार फोन करून त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रसाद जाधव करत आहेत. Pune News







