Pune Crime News : पुणे : शहरातील लोहगाव परिसरात एका बंगल्याच्या आवारातच गांजाची लागवड करून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस कारवाईत उघडकीस आला आहे. लोहगाव पोलिसांनी छापा टाकत गांजाची झाडे, वाहन आणि मोबाईल असा सुमारे सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. Pune Crime News

दरम्यान, पठारे वस्ती परिसरात गांजाची लागवड सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. 27) विशेष पथकाने छापा टाकला. Pune Crime News
या कारवाईत हर्ष भरतकुमार पांचाल (वय 30, रा. नमो पॅराडाईज, पठारे वस्ती, लोहगाव) याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्याच्या आवारात गांजाची लागवड केल्याचे समोर आले. बंगल्याच्या गार्डनमध्ये लहान-मोठी अशी तब्बल 41 गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे एकूण वजन सुमारे साडेचार किलो इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले. Pune Crime News
आरोपी हर्ष भरतकुमार पांचाल हा वापरत असलेल्या वाहनातूनही गांजा जप्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून नऊ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी हर्ष पांचाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. Pune Crime News
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी मगदुम, पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे, तसेच पोलिस हवालदार गणेश इथापे, गणेश सातपुते, पोलिस अंमलदार बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, आश्विन देठे, ज्ञानदेव आवारी, अल्पेश पोटकुले, प्रितम जंगम, सचिन जाधव, ज्ञानेश्वर आवारी, युवराज चौधरी, अशोक थोरात यांच्या पथकाने केली. Pune Crime News






