Junnar Pond Drowning: जुन्नर, (पुणे) : जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी परिसरात आज मंगळवारी (ता.28) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत शेततळ्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.ओतूर–बल्लाळवाडी हद्दीत दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. Junnar Pond Drowning

सोहम जयसिंग नवले (वय 12) आणि अभि महेश पवार (वय 10, दोघेही रा. पागरीमाथा, बल्लाळवाडी, ता. जुन्नर) अशी मृत मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बल्लाळवाडी येथील धरणाच्या मार्गावर काही बांधकाम आणि सुधारणा कामे सुरू आहेत. त्या ठिकाणीच जवळ असलेल्या शेततळ्यात खेळत असताना ही मुले बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Junnar Pond Drowning
या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांचे पथक आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे बल्लाळवाडी गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. Junnar Pond Drowning







