Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : कदमवाकवस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; लग्नसमारंभात अडीच तोळ्याची सोन्याची चैन लंपास, तर हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 April 2026, 18:50

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र समोर आले असून, अल्पावधीतच दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. भरगर्दीच्या लग्नसमारंभात गळ्यातील सोन्याची चैन लंपास करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस गेल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Loni Kalbhor 

पहिल्या घटनेत, कुंडलीक रंगनाथ गाडे (वय 65, रा. गणराज पार्क, कवडीपाट) हे रविवारी (दि. 26 एप्रिल) मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गुलमोहर लॉन्स येथे उपस्थित होते. रात्री सुमारे 8.15 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान जेवणाच्या काउंटरवर मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चालू बाजारभावानुसार सुमारे साडेतीन लाख रुपयांहून अधिक किमतीची, 25 ग्रॅम वजनाची पिळेदार सोन्याची चैन आणि ‘ओम’ नक्षी असलेले पेंडन्ट चोरून नेले. घटनेनंतर लग्नस्थळी घोषणा करूनही कोणताही मागोवा लागला नाही. Loni Kalbhor 

 

दुसऱ्या घटनेत, विजय रामचंद्र खरात (वय 49, रा. महादेव नगर, हडपसर) यांची हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. MH 12 FL 5850) ही दुचाकी चोरीस गेली. ते सितारा हॉटेल, कवडीपाट येथे मॅनेजर म्हणून कार्यरत असून, 21 एप्रिल रोजी दुपारी त्यांनी आपली दुचाकी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, 22 एप्रिल रोजी मध्यरात्री काम आटोपून परतल्यावर गाडी गायब झाल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Loni Kalbhor 

या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, “चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनांचा सखोल तपास करून चोरट्यांना तातडीने अटक करावी, तसेच परिसरात गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. Loni Kalbhor 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Bhor News : कापूरहोळमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर; कारवाईनंतर नागरिक–प्रशासन आमनेसामने

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.