Amol Kolhe : आदरणीय दादा मोठे नेते आहेत, मी काय एक कार्यकर्ता आहे. त्याच्याबाबत मी काय बोलणार. आता ते जी टीका करत आहेत, यासंदर्भात त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, तेव्हाच त्यांनी धरला असता, तर सोपं झालं असतं, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत तसेच माझ्या मतदारसंघाची त्यांनी पाहणी केली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
तसेच पुढे बोलताना म्हणाले अजित पवार यांनी जी आज पाहणी दौरा केला, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. यासंदर्भातील पाहणी आम्ही ६ महिन्यांपुर्वीच केली आहे. त्यानंतर मांजरी उड्डाणपुल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी अजित पवारांकडे मी केली होती. त्यांनी माझ्या मतदारसंघाची पाहणी केली त्यामुळे माझ्या मतदार संघातील नागरीकांसाठी सोयीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले आहेत.
तर मी माझा गौरव मानतो : अमोल कोल्हे
मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांनी माझ्यासमोर आव्हान उभं केलं तर मी माझा गौरव मानतो. आमचे दादा नेते होते, त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणारं नाही, त्यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलेन, असं अमोल कोल्हे म्हणाले. शिवाजीरान आढळराव पाटील तुमच्यावर सतत टीका करत आहेत, यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, तुम्हाला एक म्हण माहीतच असेल, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, ही म्हण त्यांना लागू पडते, अशी टीका अढळरावांचं नाव न घेता अमोल कोल्हे यांनी केली आहे.
यामुळे घेतली शरद पवारांची भेट
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की, शेतकरी आक्रोश मोर्चा उद्यापासून सुरू होत आहे. 27, 28,29, 30 तारखेला शेतकरी मोर्चा आहे. याबाबत शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतलं, या मोर्चाबाबत चर्चा झाल्याचे अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितलं आहे. त्याचबरोबर ३० तारखेला शरद पवारांची देखील सभा पार पडणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, शिवनेरीच्या पायथ्यापासून हा मोर्चा सुरू होईल, छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागू देऊ नका, अशी आज्ञापत्रात ताकीद दिली होती. त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे, यातले सहा प्रमुख मुद्दा घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जात आहे.