Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांचा दरारा मोठा… केंद्राशी बोलून त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी; अमोल कोल्हे यांचे आवाहन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 13:10

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर आज कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांचा दरारा मोठा आहे. त्यांनी केंद्र सरकारशी बोलून कांदा निर्यात बंदी उठवावी. त्यांच्याकडे अर्थखातं आहे, तर त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. मी माझ्या तत्त्वांसोबत आहे. संधी होती तेव्हाही मी सुभेदारी स्वीकारली नाही. तत्वांशी तडजोड केली नाही. म्हणून तर आज ताठ मानेन जगतोय, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

अमोल कोल्हे म्हणाले की, आमदार कोण-कोणत्या कारणामुळे भूमिकेत आहेत हा चर्चेचा विषय आहे. माझा ना कारखाना आहे, ना कंपन्या आहेत. ना माझ्यावर चौकशी आहे. त्यामुळे कुणाला निवडून द्यायचं ते जनता ठरवेल. येणाऱ्या भविष्य काळात गणित दिसेलच, असे सांगत कोल्हे यांनी अजितदादांनी उल्लेख केलेल्या एका चित्रपटाचा दाखल देत टीका केली. अजितदादांनी काल एका चित्रपटाचा उल्लेख केला. एका चित्रपटातील संवाद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना दक्खनची सुभेदारी द्यावी, असं दिल्लीपतींच्या मनात होतं. दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैक पट होती. मात्र, तेव्हा सुभेदारी स्वीकारली नाही. म्हणून आज ताठ मानेन जगतोय, असं म्हणत त्ंयांनी अजित पवार यांना टोला लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. सहा मुद्दे घेवून आपण यात्रा करत आहोत. कांदा बंदी उठवावी. दिवसा वीज द्यावी. विमा कंपन्याचे धोरण निश्चित करावे. दुधाचे दर पडले आहेत. २६ लाख लिटर दुधाचे कलेक्शन आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी आम्ही यात्रा काढत आहोत. या यात्रेसाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले आहे. पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा कांद्यावर बंदी आणावी, अशी भाजपची भूमिका होती; मात्र पवारांनी ठाम भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने निर्णय घ्यावेत यासाठी आम्ही यात्रा काढतोय, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

गर्लफ्रेंडने शॉपिंगसाठी मागितले 1 लाख; बॉयफ्रेंडने टेंन्शनमध्ये केलं असं की...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.