नाशिक : नाशिकच्या चांदवड येथे चांदवड-मनमाड राज्य महामार्गावर स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडलं आहे. हा ट्रक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण 7 लाख 94 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
चांदवडच्या एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी हा ट्रक थांबला होता. तिथेच पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर ट्रकमध्ये जिलेटीनचे स्फोटके आढळून आल्याने हा ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. ही स्फोटके कुठे घेऊन जाणार होती? याचा उपयोग कशासाठी होणार होता? याबाबत पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत.