Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी स्टेशन चौकात वाहतूक पोलिसाचे ‘पठाणी वसुली’कडे लक्ष, पण वाहतूक नियमनाकडे सपशेल दुर्लक्ष; कारवाईची होतीये मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 December 2023, 21:20

विशाल कदम
लोणी काळभोर : लोणी काळभोर वाहतूक विभागातील काही ठराविक पोलिस कर्मचारी वाहतूक कोंडीच्या वेळी, वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुलीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीत वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र नित्याचेच झाले आहे. लोणी स्टेशन चौकात वाहतूक पोलिसाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमणूक केल्याची असतानासुद्धा पोलीस कर्मचाऱ्याने चक्क भर रस्त्यात १०० मीटर पुढे थांबून ‘पठाणी वसुली’ केल्याचा प्रकार रविवारी (ता.२४) उघडकीस आला. याचा प्रत्यय आज लोणी काळभोरकरांना आला.

पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन या दरम्यान लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व नायगाव फाटा, व उरुळी कांचन हद्दीतील एलाईट चौक व तळवाडी चौक अशा पाच ठिकाणी वाहतुकीची कोंडी सतत जाणवत आहे. लोणी स्टेशन हद्दीत स्टेशन चौक ते कदमवस्ती या दरम्यान वाहने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. असे असतानाही वाहतुक पोलिस रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना अभय देत असल्याने, लोणी स्टेशन हद्दीत दिवसाआड अपघात होत आहेत. तर ऑईल कंपन्यांचे टॅंकर रस्त्यावर उभे राहत असल्याची समस्या, पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना डोळ्याने दिसत असतानाही, सर्वजण डोळे असूनही ‘आंधळे’ असल्याचे भासवत आहेत.

वाहतूक विभागातील पोलिस या चौकातील वाहतूक कोंडी दुर करण्याऐवजी, या चौकातुन ये-जा करणाऱ्याकडून वसुलीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. गरीब वाहनधारकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत. तसेच अनेक वाहनधारकांशी हुज्जत घालून अपमानित करत आहेत. विशेष म्हणजे यात अनेक वाहनधारकांची कुठलीच चूक नसताना हा आर्थिक फटका नाहक सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांचे नेमके वसुली की वाहतूक नियमन असा प्रश्न उभा राहिला आहे.

 

‘वसूली’ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?

लोणी स्टेशन चौकातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस भररस्त्यात एका नामांकित हॉस्पिटलच्या गेटच्या समोर उभा राहत आहे. रस्त्यात गाड्या अडवून त्यांच्याकडून पठाणी वसुली करत आहे. वाहतूक पोलीस रस्त्यातच डायरेक्ट समोर येत असल्याने वाहनचालक गडबड होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का? व या ‘वसूली’ कर्मचाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होणार, याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

एमआयटी कॉर्नर की अडथळ्याचा थांबा…

लोणी स्टेशनच्या पुढील चौकाला एमआयटी कॉर्नर या नावाने मागील काही वर्षापासून ओळखले जाऊ लागले आहे. मात्र, हा कॉर्नर अपघाताचे मोठे ठिकाण होऊ लागले आहे. कॉर्नरच्या दोन्ही बाजुला असलेल्या हॉटेल मालकांनी, पार्कींगसाठी जागा सोडली नसल्याने, हा चौक अतिशय धोकादायक बनला आहे. आशीर्वाद ह़ॉटेलच्या बाजुने स्टेशनहुन गावात जाताना एमआयटी कॉर्नरची अवस्था अति mशय चिंताजनक वाटावी अशी बनली आहे. रस्त्यावर मोठी वहाने व दुचाकी लागत असल्याने, या ठिकाणी मोठा मोठा अपघात होण्याची मोठी भिती आहे. ही बाब पोलिसांना दिसत असूनही, पोलिस यंत्रणा त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

लोणी स्टेशन, उरुळी कांचन हद्दीत रस्त्यावर वाहने उभी करणारे पोलिसांचे पाहुणे?

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक दरम्यान वाहनचालक रस्त्यावरच गाड्या लावतात. या बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिस कारवाई करताना आढळून येत नाहीत. लोणी स्टेशन चौक, कुंजीरवाडी गाव व उरुळी कांचन हद्दीतरस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमानात वहाने उभी असतात. अशा वाहनांवर कारवाई तर दुरच, पोलिस साधे हटकतही नसल्याचे दिसुन येत आहे. वाहतूक पोलिसांनी नियमबाह्य वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करावी यात दुमत नाही. मात्र, इतरांना याचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

‘पठाणी वसुली’कडे लक्ष, वाहतूक नियमनाकडे सपशेल दुर्लक्ष

लोणी काळभोर पोलिसांची वाहतूक शाखा वाहतूक नियमनाकडे व वाहतूक समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असली तरी, त्यांची पठाणी वसुली मात्र जोरात चालु असल्याचे दिसुन येत आहे. कवडीपाट टोलनाका तर पोलिसांच्या पठाणी वसुलीचे हक्काचे ठिकाण बनले आहे. कवडीपाट ते उरुळी कांचन दरम्यान कितीही वहातुक कोंडी झालेली असली तरी, पठाणी वसुली मात्र सुरुच असते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार हजर - गिरीश महाजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.