मुंबई : आज महाराष्ट्रात कोविड 19 चे एकूण 50 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोविड 19 च्या जेएन 1 वेरिएंट प्रकरणाचे हे रूग्ण नोंदवली गेले आहेत. ज्यामुळे राज्यात एकूण 10 जेएन.1 प्रकार आढळले आहेत. या 10 पैकी ठाण्यात 5, पुण्यात 2 आणि सिंधुदुर्ग, अकोला आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रत्येकी 1 असे रुग्ण आढळले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या आतापर्यंत 100 च्या वर गेली आहे. आज राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 103 इतकी झाली आहे. राज्याप्रमाणे देशातही सक्रिय रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसतंय.
राज्यातील कोव्हिड चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून येतंय. आज राज्यात 35 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकही रुग्ण घरी परतला नाही. राज्यात आजपर्यंत एकूण 80,23,418 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के एवढे झाले आहे.
हिवाळ्याच्या मोसमात श्वसनाच्या विषाणूंच्या प्रसारात वाढ झाल्यामुळे देखील सध्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बहुतेक रुग्णांना सौम्य संसर्ग झाला आहे. सध्या, सुमारे 41 देशांमध्ये जेएन.1 व्हेरियंट आढळला आहे.नवीन जेएन.1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंच आहे. जेएन.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट जेएन.1 चा रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे.