नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीमुळे सोने-चांदीचा भाव या आठवड्यात एक तर वाढला नाहीतर स्थिर राहीला. त्यात घसरण नोंदवण्यात आली नाही. त्या उलट सोने 880 रुपयांनी तर चांदी 2300 रुपयांनी वधारली. या आठवड्यात सोने-चांदीत दरवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती. या आठवड्यात सोने-चांदीच्या दरांनी माघार घेतली नाही.
दोन आठवड्यांचा विचार करता सोन्यामध्ये जवळपास 2000 रुपयांची वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोने 58,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 डिसेंबर रोजी सोने 100 रुपयांनी वाढले. 20 डिसेंबर सोन्याने रोजी 380 रुपयांची उसळी घेतली. 22 डिसेंबर रोजी 230 रुपयांनी भावात वाढ झाली. 23 डिसेंबर रोजी सोने 250 रुपयांनी वाढले.
आज एक किलो चांदीचा भाव 79,000 रुपये आहे. गेल्या आठवड्यात चांदी 3500 रुपयांनी महागली होती. या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 2300 रुपयांनी वाढली. 18 डिसेंबर रोजी चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. 19 डिसेंबर रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. 20 डिसेंबर रोजी चांदीने 1 हजार रुपयांची उसळी घेतली. 21 डिसेंबर रोजी चांदीत 700 रुपयांची वाढ झाली. 22 डिसेंबर रोजी चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. 23 डिसेंबर रोजी किंमती 500 रुपयांनी उतरल्या.