लोणी काळभोर, (पुणे) : येथील मल्हार हेरंब पांडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य प्रभारी सोशल मिडीयापदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पांडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
यावेळी भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे, माध्यम प्रमुख पश्चिम महाराष्ट्र अमोल कवीटकर, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, प्रसंजीत फडणवीस, आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना मल्हार पांडे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीचे काम जोरात सुरु करणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्ष वाढीसाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.”