Pune News : पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे आज (बुधवारी) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती अनिल शिरोळे, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून त्या दीर्घआजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी (बुधवारी) त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनाची व्यवस्था राहत्या घरी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत असणार आहे. अंत्यविधी वैकुंठ स्मशानभुमी नवी पेठ पुणे येथे दुपारी 4.30 वाजता होणार आहे.