पुणे प्राईम न्यूज डेस्क: मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अनेक फायदे आहेत. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल किंवा घसा खवखवत असेल तर अनेकदा आपल्याला मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. हा सोपा आणि जुना घरगुती उपाय आहे. मुख्य म्हणजे या उपायाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत मिळते. सर्दी, खोकला, घसा दुखणं हा त्रास संभवणं अगदी स्वाभाविक आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्यावर वातावरणात होणारा बदल अनेक संसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरतो. अशावेळेस अॅन्टीबायोटिक्सवर अवलंबून राहण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने मात करता येऊ शकते.
अल्सरमुळे तोंडात असह्य वेदना होतात. यामुळे अन्न खाणेदेखील कठीण होऊ शकते. पण मिठाचे पाणी या वेदना कमी करण्यास आणि अल्सर बरे होण्याची प्रक्रिया वाढविण्यास मदत करते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुमच्या छातीत जमा झालेला कफ सहज निघून जातो. यामुळे छातीत जाणवणारा जडपणा, जळजळ कमी होते आणि घशातील वेदना कमी होतात. त्याशिवाय तोंडातील जीवाणू आणि विषाणूंना बाहेर काढले जातात. रोज मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडात तयार होणारे जंतू नष्ट करण्यास मदत होते.