Aaditya Thackeray : कल्याण : आदित्य ठाकरे आता कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, सध्या मनसे आमदार राजू पाटील आणि इथल्या लोकप्रतिनिधींबाबत सर्वसामान्यांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष आहे. त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी या सर्व गोष्टी घडत आहेत. असे कल्याणमधले चित्र आहे.
दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. कल्याणच्या नागरिकांना बदल देण्याच्या अनुषंगानं किंवा फायदा घेण्याच्या अनुषंगानं सर्व उड्या घेतायत. त्या सर्वांना शुभेच्छा असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
राजू पाटील यांनी ही यावर भाष्य केलं आहे. मी सध्या पक्षाचा उमेदवार नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारणार, प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका जाहीर करत असतो. त्यांना तो अधिकार आहे, त्यावर जास्त भाष्य करणार नाही, ज्या वेळेला आमचा पक्ष भूमिका मांडेल, ती मी आपल्यासमोर स्पष्ट करेल. आमदार राजू पाटील डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात माजी उपमापोर मोरेश्वर भोईर यांच्यातर्फे आयोजित भागवत कथा पुराण कार्यक्रम उपस्थित होते. त्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
कल्याण लोकसभा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आहे. काही दिवसांपासून कल्याण किंवा ठाण्यात लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.