उरुळी कांचन, (पुणे) : येथील अमित सतिश कांचन यांची उरुळी कांचन (ता. हवेली) भाजपा शहराध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मचाले यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे पै. संदीप भोंडवे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, पश्चिम महाराष्ट्र भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, गणेश सातव, विजय जाचक, सिद्धेश हरपळे, जिल्हा युवती उपाध्यक्षा पुजा सणस, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषिकेश शेळके आदी उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना अमित कांचन म्हणाले, “पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन पुन्हा एकदा तीच जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पडण्यास कायम तत्पर आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर आहे. पक्षाने केलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहोचवण्याचे काम करणार आहे. तसेच गरीब व गरजू नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या पदाचा वापर करणार आहे.”