लोणी काळभोर : संगीताच्या तालावर नृत्य करत विद्यार्थ्यांच्या मनातील भावना कागदावर उतरविण्यात आल्या अन् त्यातून निर्माण झालेल्या थ्रीडी म्युझिकल पेंटिंगची दखल ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतःच्या वेगळ्या कलाकृतींचा संगम या पेंटिंगमध्ये झाला असून, अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच रेकॉर्ड आहे. कला साधना ड्रॉइंग ॲकॅडमीच्या १७ विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवून वेगळा विक्रम नोंदविला आहे.
हवेली तालुक्यातील महादेवनगर येथील कला साधना ड्रॉइंग ॲकॅडमीने म्युझिकल पेंटिंगची करीत इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे पेंटिंग मॉडर्न आर्ट थ्रीडी असून, ९ ते २० वर्षांखालील १७ विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा विक्रम केला आहे. कला साधना ड्रॉइंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा रूपाली कुमावत व सचिन गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा गेले तीन वर्षांपासून सराव चालू होता. यामध्ये मोडक इंटरनॅशनल स्कूल, वडकी, एंजल मिकी मिनी स्कूल आणि मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कला साधना ड्रॉइंग ॲकॅडमीमधून गेल्या एक वर्षापासून प्रशिक्षण घेत होते. ही संकल्पना ॲकॅडमीच्या संचालिका रूपाली कुमावत यांनी पूर्ण केली असून, यामध्ये त्यांना रेखा अनंत सुब्रमणियन व सागर प्रकाश हरपळे यांचे सहकार्य मिळाले.
संगीताच्या तालावर नृत्य करत ३० मिनिटांत मॉडर्न आर्ट ध्रीडी म्युझिकल पेंटिंग काढणे हा जगातील पहिला रेकॉर्ड ठरला आहे. गेल्या ३ वर्षांपासून याचा सराव चौरंग बिल्डींग, महादेव नगर, मांजरी रस्ता, ता. हवेली येथे सुरू होता. यामध्ये मोडक इंटरनॅशनल स्कूल, वडकी, एंजल मिकी मिनी स्कूल व मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलचे हृद्ध्या थोरात (इयत्ता चौथी), अवधूत सरोदे (इयत्ता सहावी), सार्थक मोडक, प्रियांका यादव, तनिष्का जाधव, अनन्या अहिरे, आर्या उंबरकर (सर्व इयत्ता आठवी), हरिज्ञा थोरात, आदर्श बागडे, मोहन भोसगी (सर्व इयत्ता नववी), साक्षी कदम (इयत्ता दहावी), श्रेया भारती, तन्वी जगताप (सर्व इयत्ता दहावी), अभिमन्यू कडलग, विश्वजीत कामठे (इयत्ता अकरावी) व समृद्धी दळवी, नेहा हिंगसे हे १७ विद्यार्थी कला साधना ड्रॉइंग अकॅडमीमधून गेल्या एक वर्षापासून प्रशिक्षण घेत होते. या रेकॉर्डमधे नृत्य, संगित आणि पेंटिंग याचा सुंदर असा मिलाफ पहायला मिळतो. या पेंटिंग चारही बाजूने पाहिल्यास प्रत्येक वेळेस वेगळे दृश्य दिसते.
यामध्ये कोणत्याही प्रकारचे चित्र ठरवून केलेले नसते. प्रत्येक वेळी विद्यार्थांची काय मानसिकता असते त्यावर हे अवलंबून असते. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर त्याचा मनातील भावना नृत्य, संगीत याद्वारे कागदावर येतात. यात प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची वेगळी कलाकृती बघायला मिळते.
१७ वर्षांच्या प्रयत्नांना यश
मुसिकल पेंटिंग हा प्रकार अवघड आहे. तीन वर्षांपूर्वीच ही संकल्पना माझ्या डोक्यात आली होती. हा रेकॉर्ड करायचा हा विचार घेऊन गेल्या एक वर्षापासून १७ विद्यार्थ्यांसमवेत सराव सुरू होता. अखेर प्रयत्नांना यश मिळाले असून, भारतातून अशा एकमेव आणि पहिल्या विक्रमाची नोंद झाली आहे. संगीत आणि नृत्य यांची सांगड घालून ए-३ च्या कागदावर हे चित्र रेखाटलेले आहे. चारही बाजूंनी हे चित्र एकसारखे दिसत असून, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
– रूपाली कुमावत, अध्यक्षा, कला साधना ड्रॉइंग अकॅडमी