Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्रसरकारच्या क्षयरोग पथकाची दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालयांना भेट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 17:31

राहुलकुमार अवचट

यवत : राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या क्षयरोग पथकाने मावळ, खेड व दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषध विक्रेते यांना भेटी देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या वेळी दौंड शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल, पिरॅमिड हॉस्पिटल यांना तर केडगाव येथील मयुरेश्वर हॉस्पिटल याठिकाणी पथकाने भेट दिली. या वेळी रुग्णालय प्रशासनाबरोबर क्षयरोगाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक घेतली. खासगी क्षेत्रातील क्षयरुग्ण नोंदी वाढविणे, खासगी व्यावसायिकांना कामकाजाबाबत पत्र देवून अनुदान वेळेत वितरित करणे, राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत संबंधितांनी रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणे आदी सूचना त्यांनी दिल्या.

राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रम सर्व शासकीय आरोग्य संस्थेमार्फत राबवला जातो. याअंतर्गत जास्तीत जास्त क्षयरुग्णांची नोंदणी करून तपासणी केली जाते. रुग्ण काही वेळेस उपचार घेण्यास टाळाटाळ करतात व उपचार पूर्ण न केल्यास क्षय रुग्णाला धोकादायक स्थितीला सामोरे जावे लागते. परिणामी महागडी औषधे घ्यावी लागतात व त्यानंतर तो नियमित औषधोपचारांना दाद देत नाही. हे लक्षात घेता अभियानास बळकटी येण्यासाठी खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषध विक्रेते यांचा सहभाग घेण्यात येत आहे.

या वेळी डॉ. निरज रायजाता, डॉ. विशाल अभिषेक, डॉ. येवले यांच्या पथकाबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, छगन कापसे आदी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

अहमदनगर हादरलं! 400 ते 500 लोकांचा कुटूंबावर जीवघेणा हल्ला; कुटुंबाने घेतला पोलीस स्टेशनचा आसरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.