Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 July 2026, 13:00

लोणी काळभोर: कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील इंदिरानगरमध्ये घरासमोर खोदलेल्या आणि पावसाच्या पाण्याने भरलेल्या चरीत पडून दोन वर्षीय सोहम कसबे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर संबंधित ठेकेदाराविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्काळजीपणामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी सोहमची आई शिल्पा लखन कसबे (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाबाई मंदिराजवळील इंदिरानगर परिसरात सुमारे आठ दिवसांपूर्वी सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मोठा चर खोदण्यात आला होता. मात्र, खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था, संरक्षक कठडे, इशारा फलक किंवा पाण्याचा निचरा करण्याची उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी तीन ते चार फूट खोल आणि सुमारे पाच फूट रुंद खड्ड्यात पावसाचे व सांडपाणी साचून तो जीवघेणा ठरला.

सोहम घरासमोर खेळत असताना ३० जून रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाला. आईने परिसरात शोध घेतला असता चरीजवळ त्याची चप्पल दिसली. त्यानंतर नातेवाईकांनी पाण्यात शोध घेतला असता सोहम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने विश्वराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, संबंधित ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता खोदलेला चर तसेच त्यात साचलेले पाणी यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळेच दोन वर्षांच्या चिमुकल्याचा बळी गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर संबंधित ठेकेदाराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत होती. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी फिर्याद दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

निमसाखर खूनप्रकरणातील फरार आरोपीला अटक ;वालचंदनगर पोलिसांची कारवाई, 18 महिन्यांपासून होता फरार

Wednesday, 26 August 2026, 18:24

पुण्यात उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; आंदोलनाच्या ठिकाणी वाढली चिंता!

Wednesday, 26 August 2026, 18:12

‘भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 150 मीटरवर काय घडलं? मूर्तीकार अनिकेत देसाईचा जबाब, BMCकडून नवीन नियमावली जाहीर

Wednesday, 26 August 2026, 17:27

लोणी काळभोरमध्ये ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह; मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश!

Wednesday, 26 August 2026, 17:07

उरुळी कांचन येथे ब्यूटी पार्लरचालक महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण तर मालकिणीवर अॅसिड टाकण्याची धमकी, 4 महिलांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 26 August 2026, 17:00

इंदापूरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 26 August 2026, 16:31
Next Post

Actiecodes en Promotievoorwaarden bij NomaSpin Casino voor de Nederlandse markt

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp