Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे ब्यूटी पार्लरचालक महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण तर मालकिणीवर अॅसिड टाकण्याची धमकी, 4 महिलांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 26 August 2026, 17:00

उरुळी कांचन : जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलांच्या टोळक्याने ब्युटी पार्लरमध्ये घुसून काम करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. तर पार्लरच्या मालकिणीवर अॅसिड टाकण्याची धमकीही देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी शाळेजवळ रविवारी (ता. 23) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी 4 महिलांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका गणेश अंबारे (वय-30, रा. आश्रम रोड, स्वामी शाळेजवळ, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अंबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरती निलेश शेलार (रा. बायफ रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) आणि तिच्यासोबत आलेल्या 3 महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित प्रियंका अंबारे या बायफ रोडवरील निशा जगताप यांच्या ‘आरोही ब्यूटी पार्लर’मध्ये काम करतात. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रियंका अंबारे पार्लरमध्ये एकट्याच असताना आरती निलेश शेलार (रा. बायफ रोड), तिची आई, तिची बहीण आणि इतर एक महिला अशा चौघीजणी पार्लरमध्ये अनाधिकृतपणे घुसल्या.

“निशा जगताप कुठे आहे? ती कुठे राहते?” अशी विचारणा करत या महिलांनी प्रियंका यांना थेट शिवीगाळ व दमदाटी सुरू केली. त्यानंतर जुन्या वादाचा राग मनात धरून आरती शेलार व तिच्यासोबत आलेल्या महिलांनी प्रियंका यांच्यावर हल्ला चढवला. आरती शेलार हिने पार्लरमधील पाण्याचा निळ्या रंगाचा जार उचलून थेट प्रियंका यांच्या पाठीवर मारला. तर तिच्या बहिणीने पायातील चप्पल काढून प्रियंका यांच्या डोक्यात आणि पाठीवर मारली. आरतीच्या आईने प्रियंका यांच्या डोक्याचे केस घट्ट पकडून त्यांना डोक्यात, तोंडावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

आम्ही निशा जगतापला सोडणार नाही, तिच्यावर ॲसिड टाकणार!” अशी धमकी देत चौथ्या महिलेनेही प्रियंका यांना केस पकडून बेदम चोप दिला. यावेळी प्रियंका यांनी जीव वाचवून रस्त्यावर धाव घेतली. तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तात्काळ पार्लर मालकीण निशा जगताप यांना फोन करून माहिती दिली. निशा यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी प्रियंका यांना गणराज हॉस्पिटल उरुळी कांचन येथे दाखल केले.

दरम्यान, उपचार सुरू असताना उरुळी कांचन पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार उद्धव गायकवाड पुढील तपास करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 150 मीटरवर काय घडलं? मूर्तीकार अनिकेत देसाईचा जबाब, BMCकडून नवीन नियमावली जाहीर

Wednesday, 26 August 2026, 17:27

लोणी काळभोरमध्ये ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह; मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश!

Wednesday, 26 August 2026, 17:07

उरुळी कांचन येथे ब्यूटी पार्लरचालक महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण तर मालकिणीवर अॅसिड टाकण्याची धमकी, 4 महिलांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 26 August 2026, 17:00

इंदापूरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 26 August 2026, 16:31

गणेशोत्सव आणि दहीहंडीत डीजे वाजवल्यास थेट जप्तीची कारवाई! पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या कठोर भूमिकेने खळबळ

Wednesday, 26 August 2026, 15:57

MPSC पेपरफुटीच्या कटाचा पर्दाफाश! आयोगातील 3 अधिकाऱ्यांसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 26 August 2026, 15:51
Next Post

लोणी काळभोरमध्ये ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह; मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp