Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेशोत्सव आणि दहीहंडीत डीजे वाजवल्यास थेट जप्तीची कारवाई! पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या कठोर भूमिकेने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 15:57

पुणे: पुण्यात गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या उत्सवात कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तीव्र आवाज करणाऱ्या डीजे, प्लाझ्मा आणि प्रेशर मीडसारख्या उपकरणांवर बंदी कायम राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची ध्वनियंत्रणा थेट जप्त केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत विविध विभागांचे अधिकारी, पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. मात्र, ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा गांभीर्याने घेत पोलिसांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत.

गणेशोत्सव साजरा करण्यास पोलिसांचा कोणताही विरोध नाही. मात्र, इतर नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यास परवानगी दिली जाणार नाही. ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत लागू असलेल्या नियमांचे पालन प्रत्येक गणेश मंडळाला करावे लागणार आहे. ध्वनीची निर्धारित पातळी ओलांडली जाऊ नये, यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित केली जाणार आहे. तसेच डीजेमध्ये किती ‘बेस’ आणि ‘टॉप’ वापरता येईल, याबाबतही नियमांच्या चौकटीत निर्णय घेतला जाणार आहे.

ध्वनिप्रदूषणाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होऊ शकतो. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना केले आहे.

 

उत्सवाच्या सुरुवातीपासूनच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवताना आढळल्यास संबंधित मंडळावर कारवाई केली जाईल आणि डीजेची यंत्रणा जप्त केली जाऊ शकते.

“उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तीव्र आवाजाला परवानगी दिली जाणार नाही. प्लाझ्मा आणि प्रेशर हॉर्नवर पूर्णपणे बंदी राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट जप्तीची कारवाई केली जाईल,” असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव…

Friday, 25 September 2026, 12:07

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

Friday, 25 September 2026, 11:13

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Friday, 25 September 2026, 11:09

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा GR जारी; खात्यात 1,500 की 3,000? नेमकं काय ठरलं?

Friday, 25 September 2026, 10:47

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14
Next Post

इंदापूरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp