Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह; मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 August 2026, 17:07

लोणी काळभोर : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरातील मुस्लिम बांधवांनी ‘ईद-ए-मिलाद’ मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने बुधवारी (ता.26) साजरी केली. यंदा शाही दरबार मिरवणुकीला फाटा देत काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे मिरवणुकीत लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने त्यांचे उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील बागुल शहा वली दर्गा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. लोणी काळभोर गावातून मार्गक्रमण करत मिरवणूक कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात पोहोचली. यावेळी शमा इलेक्ट्रीकल्स वर्क्सचे मालक रमजान तांबोळी, इजाज खान, फिरोज मेटकरी, इरफान शेख आणि समीर सय्यद यांनी मिरवणुकीतील मुस्लिम बांधवांना पाणी व फळांचा ज्यूस वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

त्यानंतर मिरवणूक लोणी स्टेशन येथून इंदिरानगर, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बाग मार्गे पुन्हा बागुल शहा वली दर्ग्यापर्यंत नेण्यात आली. दर्गा परिसरात नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यंदाच्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते लहान मुलांचे उत्स्फूर्त सहभागी होणे. मोठ्या संख्येने मुलांनी मिरवणुकीत सहभाग घेत पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीची आणि बंधुभावाची भावना समाजापर्यंत पोहोचवली.

दरम्यान, ईद-ए-मिलादनिमित्त लोणी काळभोर व परिसरातील मशिदी, दर्गे, घरे आणि दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तैबुद्दीन मुंडे, पोलिस हवालदार वैजिनाथ शेलार, सर्जेराव धडस यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मिरवणूक मार्ग तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला.

 

यावेळी आलमगीर ट्रस्टचे फय्याज इनामदार, अफजल इनामदार, इम्रान शेख, मौलाना मेहबूब शेख, आदम इनामदार, गफूरभाई शेख, ताहेर खान, आयाजभाई इनामदार, रियाज शेख, अकील इनामदार, निजाम तांबोळी, अलीम शेख. हाजी मुसाभाई तांबोळी, नईम इनामदार, रशीद इनामदार तसेच एसडीएस फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक मिरवणूक, सामाजिक उपक्रम आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश यामुळे लोणी काळभोरमधील ईद-ए-मिलाद उत्सवाने सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव…

Friday, 25 September 2026, 12:07

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

Friday, 25 September 2026, 11:13

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? महाराष्ट्रातून पहिलं आव्हान, हायकोर्टात याचिका

Friday, 25 September 2026, 11:09

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा GR जारी; खात्यात 1,500 की 3,000? नेमकं काय ठरलं?

Friday, 25 September 2026, 10:47

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14
Next Post

‘भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 150 मीटरवर काय घडलं? मूर्तीकार अनिकेत देसाईचा जबाब, BMCकडून नवीन नियमावली जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp