Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 July 2026, 13:13

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला. झोपेतून उठवल्याचा राग मनात धरून एका चालकाने सहकारी चालकाच्या हाताला चावा घेत त्याच्यावर टोकदार वस्तूने हल्ला केल्याची घटना ३० जून रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या चालकावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी चालकाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांतकुमार श्रीजयकुमार यादव (वय ४१) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. विनोद कुमार गुप्ता असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांतकुमार यादव हे ग्रीन लाईन ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत असून, कुंजीरवाडी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या पार्किंगमध्ये ट्रक क्रमांक MH-14-KQ-4047 मध्ये इतर चालकांसह थांबले होते.

सर्वांनी जेवण केल्यानंतर चालक विनोद कुमार गुप्ता ट्रकच्या केबिनमध्ये झोपला होता. काही वेळानंतर त्याला उठविण्यासाठी निशांतकुमार यादव यांनी हलवले. मात्र, झोपेतून जागे झालेल्या विनोद कुमारने संतापाच्या भरात त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला आणि मनगटाजवळ चावा घेतला. एवढ्यावरच न थांबता ट्रकमध्ये पडलेल्या एका टोकदार वस्तूने त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या हल्ल्यात निशांतकुमार यादव जखमी झाले. त्यानंतर त्यांचे सहकारी चालक रोहित कुमार यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी जखमी चालकाच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद कुमार गुप्ता याच्याविरोधात लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

Sunday, 30 August 2026, 18:29

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Sunday, 30 August 2026, 18:17

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 30 August 2026, 18:00

अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यातील राजकीय-सामाजिक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती..

Sunday, 30 August 2026, 17:33

अन् त्यानं गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या डांबर गोळ्या! दुसऱ्यासोबत प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाचं भयानक कृत्य

Sunday, 30 August 2026, 17:27

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

Sunday, 30 August 2026, 17:06
Next Post

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! 'श्री दत्त टी स्टॉल' मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp