हनुमंत चिकणे
हडपसर (पुणे) : मौजमजेसाठी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या ३ विधीसंघर्षीत बालकांना हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गलेला लॅपटॉप व पॉलीकॅब वायर, दुचाकी व इतर साहित्य असा १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली.
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहिया गार्डन, मगरपट्टा चौक या ठिकाणी असलेल्या स्टोअर रुम व ऑफीस रुमच्या मध्ये ठेवलेले लॅपटॉप व पॉलीकॅब कंपनीच्या वायरचे बंडल चोरी झाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथक व अंमलदार यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा पोलीस तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या वर्णनाबाबत माहिती मिळाली. पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ, भगवान हंबर्डे यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे ३ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी व विचारपूस केली असता, दाखल गुन्हा तसेच हडपसर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे आणखी ३ गुन्हे केल्याची माहिती दिली. संबंधित गुन्हे हे त्यांनी मौजमजेसाठी पैशांची आवश्यकता असल्याने केल्याचे सांगितले.
दरम्यान, दाखल गुन्ह्यातील चोरीस गलेला लॅपटॉप व पॉलीकॅब वायर, दुचाकी व इतर साहित्य असा १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, यांचे पथकाने केली आहे.