Dharashiv News : धाराशिव : महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात उमरगा शहरातून एक अत्यंत दुर्मिळ घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही दुर्मिळ घटना समजली जात आहे. उमरगा शहरातील एका मातेने चक्क २४ बोटे असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. सध्या बाळ आणि आईची प्रकृती चांगली आहे. मात्र २४ बोट असलेले बाळ ही एक आश्चर्याचीबाब समजली जात आहे.
बातमी एकताच काहींनी तर्कवितर्क लावायला सुरूवात केली असेल. मात्र, या बाळाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी ६ बोटे आहेत. तर, पायांना प्रत्येकी ६ बोटे आहेत. त्यामुळे, या बाळाची आणि या बाळाच्या आईची शहरात मोठी चर्चा होत आहे. बाळ आणि बाळाची आई हे दोघे ही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या बाळाच्या आईची ही दुसरी प्रसुती असून त्यांचे नाव रेणुका सागर वीटकर असे आहे. रेणुका यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या हाताला आणि पायाला प्रत्येकी सहा बोटे असल्याची माहिती समोर आली. ही माहिती कळताच गावातील अनेक जण उत्सुकतेने बाळाला पहायला येत आहेत. उमरगा शहरात सध्या या बाळाचीच चर्चा होताना दिसत आहे.