अमोल दरेकर
Shirur News : सणसवाडी : सणसवाडी (ता. शिरूर) येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या यश राजाराम सूर्यवंशी (वय १४) या विद्यार्थ्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, यशची आई रात्रीच्या जेवणासाठी भाजी निवडत होती. आई भाजी निवडण्यात गुंतल्याची संधी साधून यशने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. (Shirur News) दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शेजारी आणि नातेवाईकांच्या सहकार्याने त्याला खाली उतरून उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालय दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती परिसरात समजताच शोककळा पसरली. फाशीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. (Shirur News) या घटनेचा अधिक तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सविंदणे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च