Pune News : पुणे : ड्रग्स तस्कर ललित पाटील याला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. ललित पाटीलला ससून रूग्णालयातून पळून जाण्यास कोणी मदत केली, यावरून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचवेळी ललित पाटील याच्या जीवाला धोका असून, त्याचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो किंवा त्याचा आकस्मिक मृत्यू होऊन तपास थांबवला जाऊ शकतो, असे खळबळजनक विधान शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. गृहमंत्र्यांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज देखील अंधारे यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या प्रकरणात पुढे नेमकी काय कार्यवाही होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ससूनचे आधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांची नार्कोटेस्ट करण्याचीही मागणी
पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी ललित पाटील याचे एन्काऊंटर होणार असल्याची भूमिका मांडली होती. या भूमिकेला सुषमा अंधारे यांनी सहमती दर्शवली आहे. (Pune News) यासंदर्भात काही फोनही आल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. एसपी चरणजीत सिंग यांच्यासाठी फोन आला होता, त्यावर देखील मी वेळ आल्यावर बोलणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले. तसेच ससूनचे आधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांना ताब्यात घेऊन त्यांची नार्कोटिक्स चाचणी करण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
ललित पाटील याच्यावर ससून रूग्णालयात चक्क डीन ठाकूर उपचार करत होते. तशी नोंद असल्यामुळे हे स्पष्ट झाले आहे. ड्रग्ज रॅकेट प्रकरणाला सहकार्य करून संजीव ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात माया गोळा केली आहे. डाॅक्टर असताना डीन कैदी रूग्णावर उपचार का करतात? (Pune News) संजीव ठाकूर यांच्याबाबत सरकार काहीच भूमिका का घेत नाही? हर्नियाच्या ऑपरेशनला ५ महिने कसे लागतात? संजीव ठाकूर यांच्यावर फार मोठा राजकीय वरदहस्त आहे का? त्यांना ललित पाटील याच्याकडून आर्थिक लाभ होता का? असे प्रश्न उपस्थित करुन संजीव ठाकूर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
गृहखाते आतातरी दोषींवर कारवाई करणार का? असा प्रश्न ललित पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ललित पाटीलला नाशिकमध्ये कारखाना उभारण्यासाठी मदत केल्याप्रकरणी आणखी एका व्यक्तीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ललित पाटीलला ससूनमधून पलायन करण्यास मदत; अऱ्हानासह तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
Pune News : ललित पाटीलच्या आजारावर डॉक्टरनी नाही, तर चक्क ससूनच्या डीननेच केले उपचार…
Pune News : ललित पाटीलला नाशिकमधील ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मदत