Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ललित पाटीलला ससूनमधून पलायन करण्यास मदत; अऱ्हानासह तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 October 2023, 12:01

Pune News  : पुणे : ससून रूग्णालयातून पसार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या विनय अऱ्हानासह तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिषेक विलास बलकवडे (वय ३१), भूषण अनिल पाटील (वय ३४, दोघेही रा. नाशिक) आणि विनय विवेक अऱ्हाना (वय ५०) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयाच्या वाॅर्ड क्र १६ मध्ये उपचार घेत असताना भूषण पाटीलने २९ सप्टेंबर रोजी, तर अभिषेक बलकवडे याने ३० सप्टेंबर रोजी त्याची भेट घेतली होती. या दोघांनी कट रचून ललित पाटीलला पळविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कट रचून ललित पाटीलला पळविल्याचे तपासात निष्पन्न

ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार झाल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना ललित पाटीलला फरार होण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात वर्ग केले आहे. (Pune News ) याच दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केलेल्या विनय अऱ्हाना याला बुधवारी तळोजा कारागृहामधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यापूर्वी दत्तात्रय डोके आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली आहे.

 

दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर रोजी पळून गेला. त्यावेळी अऱ्हाना याने त्याला पळून जाण्यासाठी मदत केली. (Pune News ) अऱ्हानाकडे काम करणारा चालक दत्तात्रय डोके याने ललितला गाडी मिळवून दिली. तत अऱ्हानाचा व्यवस्थापक अश्विन कामत याने त्याला एटीएम दिल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. विनय अऱ्हाना याने कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटीलला मदत केली? पळून जाण्याचा कट कुठे रचला? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.

या प्रकरणी विनय अऱ्हाना यांच्या वतीने भाग्यश्री सोतूर यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीला विरोध केला. अऱ्हाना यांच्या बाजूने युक्तीवाद करताना वकील सोतूर यांनी सांगिले की, आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना ते चालक आणि व्यवस्थापकाला ललित पाटीलची मदत करा असे कसे काय सांगू शकतात? ललित पाटील पळाल्यानंतरही अऱ्हाना चार दिवस ससून रुग्णालयात होते. (Pune News ) त्याचवेळी त्यांची चौकशी का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या वतीने संदीप बाली यांनी बाजू मांडली.
दरम्यान, नायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ललित पाटीलला नाशिकमधील ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मदत

Pune News : चारचाकीचा दूचाकीला धक्का लागून दोघे खाली पडले; विचारपूस करत असताना चारचाकी घेऊन पसार…

Pune News : स्वारगेट परिसरात रिक्षा चालकांकडून तरुणाचा खून ; चारही रिक्षा चालकांना अटक..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Sad News : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.