Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sad News : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 27 October 2023, 12:17

Sad News : अहमदनगर : बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेलेले आणि संघर्षशील नेता असा परिचय असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ढाकणे हे न्युमोनिया या आजाराने ग्रस्त होते. गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. यातच त्यांची प्रकृती खालावली. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. दीपक यांनी दिली.

वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ रोजी अकोला येथे झाला. विद्यार्थी दशेत असतानाच थेट दिल्ली गाठून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये त्यांनी भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन. त्यानंतर गोवा मुक्ती सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. (Sad News) बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा होता. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. पाथर्डी तालुक्यातील विकासासाठी विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली आठवण आजही आवर्जून सांगितली जाते.

बबनराव ढाकणे हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी कॉंग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. ऊस तोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध प्रश्न त्यांनी तडीस नेले. (Sad News) पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभा केला.

 

ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एकपर्यंत ठेवण्यात येणार आहे.(Sad News)  त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Sad News : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

Sad News : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

Shirur Sad News : रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारेला चिटकून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; शिरूर तालुक्यातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय रणसंग्राम! काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा अन् भाजपने दिले जशास तसे उत्तर

Friday, 31 July 2026, 16:12

अभिजित दिपकेंची राजकारणात एन्ट्री? भाजप -काँग्रेसचा अंदाज फेल ; पक्षप्रवेशाबाबत मोठा खुलासा..

Friday, 31 July 2026, 15:58

“श्रीमंतीचे खोटे आमिष, लग्नानंतर पैशांचा तगादा अन् मारवाडी साडीची सक्ती; लोणी काळभोरच्या विवाहितेचा अमानुष छळ, पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा!”

Friday, 31 July 2026, 15:33

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57
Next Post
Hasan Mushrif crictized NCP state president Jayant Patil

Hasan Mushrif: जयंत पाटील एका घटनेमुळे वाचले, नाहीतर त्यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती, मुश्रीफांचा गौप्यस्फोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.