Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : भाजपला धक्का, आणखी एका माजी आमदाराने साथ सोडली; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 27 October 2023, 16:57
BJP ex mla Vinayakrao Patil to Join Nationalist Congress Party on sunday

लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु झाल्याची स्थिती आहे. कारण माजी आमदार विनायकराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हा निर्णय स्वत: विनायकराव पाटीला यांनी जाहीर केला आहे. 29 ऑक्टोबर रोजी ते खासदार शदर पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश करतील.

 

सध्या राज्याच्या राजकारणात गटबाजीचं राजकारण सुरु झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि आमदारांनी त्यांची भूमिका निवडली. अनेकांनी आपला पक्ष देखील बदलला. तसेच पक्ष बदलण्याचं माजी आमदारांचं सत्र अजूनही सुरुच आहे.

यावेळेस ही गटबाजी संपेल आणि आपली उमेदवारी निश्चित होईल अशी आशा विनायकराव पाटील यांना होती. मात्र जिल्हाध्यक्षपदी त्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले उमेदवार दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे विनायकराव पाटील समर्थक गटामध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यातच भाजपाचे जिल्ह्यामध्ये अनेक गट तट तयार झाल्याने विनायकराव पाटील यांची भाजपामध्ये घुसमट होत होती. त्यातच सगळे विरोधक हे एकत्र आलेत त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभे राहिल्यास मतदार आपल्या बाजूने येतील हे लक्षात घेत विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे.

माजी आमदार विनायकराव पाटील हे लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम देखील केलं आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपातील गटबाजीचा फटका त्यांना बसला होता. यामध्येच त्यांचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी आमदार विनायकराव पाटील यांचा हा निर्णय अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार बाबासाहेब पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. आमदार पाटील यांच्या विरोधात आता विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीत जाऊन दंड थोपटले आहेत. अहमदपूर मतदार संघाची रचना, विनायकराव पाटलांच्या कार्यकर्त्याची फळी आणि शरद पवार यांची मदत या त्रिसूत्री संगम करत पाटील यांनी बाबासाहेब पाटील यांना तगडे आव्हान आत्ताच निर्माण केल्याचे चिन्ह आहेत.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! महाराष्ट्राला मिळणार 27 नवीन आमदार, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 16 April 2026, 11:17

लोणी काळभोर येथील बस स्थानकासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा अपघात; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने कोंडी सुटली..

Thursday, 16 April 2026, 10:53

आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार; ‘TCS’ने उचलले मोठे पाऊल, काम तडकाफडकी थांबवले!

Thursday, 16 April 2026, 10:31

जळगावच्या 7 हजार शेतकऱ्यांना मोठा धक्का! जिल्हा बँकेचा पीक कर्जाबाबत ‘हा’ नवा नियम ठरणार अडथळा?

Thursday, 16 April 2026, 10:05

गतिमंद महिलेला घरात ओढलं अन् अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; पुणे येथील घटना

Thursday, 16 April 2026, 9:52

निदा खानच निघाली मास्टरमाईंड! नाशिक धर्मांतर प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाने खळबळ

Thursday, 16 April 2026, 9:33
Next Post

Pune News : ललित पाटीलच्या जीवाला धोका, कधीही एन्काऊंटर होऊ शकतो? शिवसेना नेत्याच्या विधानाने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.