Indapur News : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर शहर बाह्यवळणाजवळ एका भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना मंगळवारी (ता. २४) घडली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. पेटवलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न करताना इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले. या घटनेची चौकशी करून, इंदापूर पोलीस ठाण्याने संबंधित १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार जखमी
याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अर्जुन पांडुरंग नरळे यांनी फिर्याद दिली आहे. (Indapur News) दरम्यान, गलांडवाडी नंबर १ गावच्या हद्दीतील सोलापूर-पुणे महामार्गालगत असलेल्या मातोश्री हॉटेलसमोर अपघातातील ट्रक क्रमांकही तेथे जमलेल्या जमावाने पेटवला. या घटनेत सुमारे १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले.
संतप्त जमावाने आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या वाहनाला साधारण एक तास अडवून आग आटोक्यात आणण्यापासून रोखले. (Indapur News) तेव्हा त्या जमावाला समजावून सांगून जमाव पांगविण्याचे आदेश दिले. तरीही संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून, रस्ता अडवून पोलिसांचा आदेश डावलला. पोलिसांशी धक्काबुक्की करून अरेरावीची भाषा केली. या प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. यासाठी त्यांच्या विरोधात सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : दसऱ्याची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकची धडक; जागीच ठार
Indapur News : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू ; पतीला नातेवाईकांना दिला चोप