Pune News : पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनासाठी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी (ता. २४) संपली. मात्र, अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. येत्या २८ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पूजन होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजित पवारांना या कार्यक्रमाला येण्यास मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला आहे. माळेगाव पोलीस आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. अजित पवार मोळी पूजनासाठी आल्यास कारखान्यात जाऊ देणार नाही, असा इशारा देखील बारामतीत मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
माळेगाव पोलीस आणि साखर कारखान्याला दिले पत्र
मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. या काळात सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे जरांगे पाटील म्हणाले होते. (Pune News) त्यांनी सरकारला दिलेली मुदत काल संपली. मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला ठिकठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे. या आंदालनाचे आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. नुकताच दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी राजीनामा देवून, मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चाने विरोध केला आहे. अजित पवारांना बोलावू नका, अशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला दिले आहे. (Pune News) जर अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मराठआ आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणादरम्यान अन्न-पाणी तसेच औषधही घेणार नसल्याचे सांगितले आहे. गावात कोणी आल्यास त्यांना शांततेत माघारी पाठवा, असे आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केले आहे. (Pune News) कोणीही आत्महत्या करू नका, शांततेत आंदोलन करा, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी कानगावात तीन ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा
Pune News : बारामतीच्या रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा परवाना निलंबित; सलग अपघातानंतर मोठी कारवाई
Pune News : अजित पवारांच्या सभेत मराठा समाजाचा आक्रोष; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी