Pimpri News : पिंपरी : प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान याने २ ऑक्टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे फाटा येथे राहत्या घरात आर्थिक व्यवहारातून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. डेबू खान याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहारातून केली होती आत्महत्या
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पांडुरंग सूर्यवंशी उर्फ देवा (रा. हडपसर, पुणे), प्रतीक जाधव, (रा. भारती विद्यापीठ, पुणे), गणेश वाळुंज आणि आकाश बारणे उर्फ नन्या माऊली वडेवाले (दोघेही रा. कात्रज, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Pimpri News) याप्रकरणी डेबू यांच्या बहिणीने मंगळवारी (ता. १७) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ डेबू याने आरोपींना बचत गटाचे तसेच बॅंकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले होते. डेबू आरोपींकडे पैसे मागत होता. मात्र, आरोपींनी पैसे दिलेच नाहीत, असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ केली. (Pimpri News) आरोपींनी डेबू याला न वटणारे धनादेश देऊन फसवणूक केली. अशा प्रकारे आरोपींनी वारंवार दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून डेबू यांनी २ ऑक्टोबर रोजी शिंदे वस्ती, सोमाटणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : जीवनाविषयी मी कृतार्थ! : ह.भ.प. सुचेता गटणे
Pimpri News : आई, बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्याच्या रागाने गळ्यावर चाकूने वार; दोघांना अटक