Pune News : पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी तीन एकर जमीन एका खासगी विकासकाला देण्याचा घाट घातला होता, असा आरोप केला आहे. मात्र, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा दावा फेटाळत, जमिनीबाबत आपल्याला असा कोणताही अधिकारच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
माझ्यावरच फोकस का केला जातो?
अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मीरा बोरवणकर यांनी जो प्रसंग सांगितला त्यावेळचा शासन निर्णयच वाचून दाखवला. पु्स्तकात इतर गोष्टीही असताना माझ्यावरच फोकस का केला जातो? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.
येरवडा येथील ३ एकरची जागा खासगी विकासकाला देण्याच्या प्रस्तावाशी माझा काहीही संबंध नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काहीही संबध नाही. (Pune News ) त्यावेळी गृह विभागाचे मंत्री आर. आर. पाटील होते. एका प्रकरणात यातील एका कंपनीवर ईडीने कारवाई केली. त्यामुळे हा प्रस्ताव सरकारनेच पुढे रद्द केला. आजही ही जागा सरकारच्या ताब्यात आहे. हा प्रस्ताव कुणामुळे बदलला गेला नाही, असं म्हणत अजित पवारांनी मीरा बोरवणकर यांचा दावा खोडून काढला.
या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पुस्तक लिहिताना काहींना वाटते की प्रसिद्धीसाठी खळबळजनक गोष्टी लिहिल्या की त्याला वेगळी प्रसिद्धी मिळते. त्यात लगेच विरोधी पक्षातल्या लोकांनी चौकशी करा वगैरे प्रकार सुरु केले.(Pune News ) तो त्यांचा अधिकारच आहे. या प्रकरणाची चौकशी करा. मला त्याची भीती वाटत नाही. माझी कुठल्याही कागदावर सही केलेली नाही. कुठल्याही मिटिंगला मी हजर नव्हतो. असे म्हणत अजित पवार यांनी मीरा बोरवणकर यांना टोला लगावला.
जमिनीच्या व्यवहाराचे अधिकार हे मंत्रिमंडळाचे असतात. काही वेळा महसूल विभागाच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया होते. सरकारचे नुकसान होईल, असे काम मी कधीच करत नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. माझं काम भलं आणि मी भला असं करत मी पुढे जात असतो. गेले तीन चार दिवस सातत्याने माध्यमांत बातम्या आल्या. (Pune News ) मी त्या बातम्यांना जास्त महत्त्व दिले नाही. त्या बातम्यांशी माझा दुरान्वये संबंध नाही. अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. अपवाद मी सरकारमध्ये नव्हतो तो काळ होता. ज्या जिल्ह्याची माझ्यावर जबाबदारी असते त्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावावे असा माझा प्रयत्न असतो. पालकमंत्री या नात्याने आढावा बैठका घेतो. काही समस्या असतील तर सोडवता कशा येतील, याचा प्रयत्न असतो. एखादे काम होत नसेल तर ते का अडलेले आहे यासाठी विविध विभागातील आढावा घेतो. म्हणून पुण्यातही मी आढावा बैठका घेत असतो.
आता एका रिटायर्ड आयपीएस ऑफिसरने पुस्तक लिहिले. त्यांच्या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत, पण याच विषयाची चर्चा सुरु आहे. (Pune News ) यातून अधिक प्रसिद्धी मिळते म्हणून असे सुरु असेल. त्या पुस्तकातून सातत्याने काहीतरी बातम्या येऊ लागल्या. यातून अजित पवार अडचणीत, चौकशी करा. पण, मी काहीही केलेले नाही… असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अजितदादांवर केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात ; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण..
Pune News : महिलेचे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून मागितली खंडणी ; पुण्यातील घटना..
Pune News : पत्नीला तिहेरी तलाक पद्धतीने दिला तलाक, वानवडीतील घटना