Pune news : पुणे : भारताने पाकिस्तानला धुळ चारली आणि वर्ल्ड कपमध्ये मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर पुणेकरांनी जल्लोष केला. मात्र, जल्लोष करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री नारायण पेठेतील लोखंडे तालीन चौकात घडली.
नारायण पेठ, लोखंडे तालीम चौकातील घटना
याप्रकरणी क्रिकेट प्रेमींवर लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजेश येनपुरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. (Pune news) याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, क्रिकेट सामन्यानंतर तरुणांनी लोखंडे तालीम चौकात जल्लोष केला आणि आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यावेळी तेथे गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांची चौकशी केली. या वेळी काही तरुणांनी घोषणा दिल्याने पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान, माजी नगरसेवक राजेश येनापुरे यांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना अडवले. मात्र, पोलिसांनी लाठीमार केल्याने येनपुरे यांनी नाराजी व्यक्त केली.
पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांना या घटनेची माहिती दिली आणि लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे
Pune News : पुण्यातील बाबा भिडे पूल तब्बल दोन महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद; काय आहे कारण…