Pune News : पुणे : शहर आणि परिसरात श्वानप्रेमींची संख्या काही कमी नाही. अनेक घरांमध्ये पाळीव श्वान आढळतात. मात्र, भटक्या कुत्र्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र, भुतदया दाखविण्याच्या मानवी स्वभावाला अनुसरून पिंपरी-चिंचवडमधील एका कुत्र्याला जीवदान देण्यात पुणेकरांना यश आले आहे. त्याचे झाले असे, गेली आठ दिवसांपासून येथील एका भटक्या कुत्र्याच्या तोंडात बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्याच स्थितीत फिरत होता. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती; मात्र, घाबरून तो कुत्रा कुणालाही जवळ फीरकू देत नव्हता. पण जिद्द सोडतील तर ते पिंपरीकर कसले…मोठ्या प्रयत्नाने त्या श्वानाला पकडून, त्याच्या तोंडाभोवती अडकलेली बरणी काढून, त्रिशूल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर योग्य ते उपचार देखील केले. कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या भूतदयेमुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
अखेर तरुणांनी दाखविली भूतदया अन् श्वानाचे वाचले प्राण!
पिंपरी चिंचवडजवळ असणाऱ्या किवळे गावातील एका भटक्या कुत्र्याच्या तोंडात प्लॅस्टीकची बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो कुत्रा त्या परिस्थितीत फिरत होता. तोंडात बरणी असल्यामुळे त्याला काहीच खात, पिता येत नव्हते. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. (Pune News) त्याची ही परिस्थिती पाहून अनेकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु भीतीमुळे तो कोणाच्या हाती लागत नव्हता. अखेर परिसरातील त्रिशूल मंडळाच्या कार्यकर्त्यांना संबंधित श्वानाची माहिती मिळाली. त्याला पकडण्यासाठी तरुणांनी कंबर कसली.
कार्यकर्त्यांनी महत्प्रयासाने श्वानाला पकडले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. अनेक दिवसांपासून तोंड बरणीत अडकल्याने कुत्र्याचे तोंड सडू लागले होते. त्यातून दुर्गंधी सुटली होती. पोटात अन्न-पाणी नसल्यामुळे शरीरातील त्राण गेला होता. (Pune News) कुत्र्याची अवस्था दयनीय झाल्यामुळे अखेर बरणी कापून त्याचे प्राण वाचण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला.
दरम्यान, कुत्र्याला या संकटातून सुखरूपपणे सोडविल्यानंतर डॉग रेस्कू टीमकडे पाठवण्यात आले. रेस्कू टीमने त्याला रुग्णालयात नेले. त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. (Pune News) येत्या काही दिवसांत हा कुत्रा ठणठणीत बरा होईल, असे पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यावर राबवलेल्या या रेस्कूमुळे प्राणीमित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला टोळक्याची मारहाण ; तिघांना बेड्या..
Pune News : शेतात राबणाऱ्या हातांना पोलिस भरतीत यश ; ललिता झाली मुंबई शहर पोलीस चालक..