पुणे प्राईम न्यूज: भारतीय क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अव्वल रँकिंगमुळे भारताला विजेता घोषित करण्यात आले. भारतीय संघाच्या खात्यात आणखी एका सुवर्णाची भर पडली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही.
Hangzhou Asian Games: India cricket team gets gold medal after the match was called off due to rain. India won gold because of a better international ranking than Afghanistan. pic.twitter.com/XED9XtHoLK
— ANI (@ANI) October 7, 2023
हांगझू येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाने 18.2 षटकात 5 गडी गमावून 112 धावा केल्या होत्या. यानंतर पावसाने व्यत्यय आणल्याने सामना पुढे जाऊ शकला नाही. अफगाणिस्तानसाठी सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. संघाने दुसऱ्या षटकात 5 धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर झुबैद अकबरी 5 धावा करून बाद झाला. यानंतर अफगाणिस्तानने तिसर्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शहजादच्या (4) रूपाने दुसरी विकेट गमावली. यानंतर अफगाणिस्तानला सावरता आले नाही.
हेही वाचा:
मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक; पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण
भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू