Shirur News : कवठे येमाई, (पुणे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील प्रभाग क्रमांक ५ मधील अनुसूचित जाती या प्रवर्गातील जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या वार्डातील एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाल्याने या ठिकाणी निवडणूक आयोगाने रिक्त पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मलठणच्या मंडल अधिकारी माधुरी बागले यांची निवड करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र सोमवारी (ता. १६) ते शुक्रवारी (ता. २०) ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय शिरूर, तिसरा मजला सभागृह क्रमांक- १ येथे दाखल करता येईल.
नामनिर्देशन पत्रांची छानणी सोमवारी (ता. २३) होईल. नामनिर्देशन पत्रे बुधवारी (ता. २५ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
दरम्यान, रविवार (ता. ०५ नोव्हेंबर) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी तहसीलदार कार्यालय शिरूर येथे सोमवार सोमवारी (ता. ०६ नोव्हेंबर) रोजी होईल असे तहसीलदार शिरूर व निवडणूक आयोगाकडुन सांगण्यात आले आहे.