Pune News : पुणे : पुणे ग्रामीण विभागात आजोजित केलेली दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा लोणावळा व देहू रोड येथे रविवारी (ता.०१) संपन्न झाली आहे. अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे..
डाकघर अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली माहिती
टपाल विभागातर्फे दिनदयाळ स्पर्श योजनेअंतर्गत महाराष्ट्र सर्कल मध्ये दरवर्षी सहावी ते नववी मधील एकूण ४० विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपयेप्रमाणे एकूण ६ हजार इतकी शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. (Pune News) त्यासाठी शाळेत फिलाटेली क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना टपाल विभागातील तिकीट संग्रह व इतर माहिती दिली जाते व त्याची परीक्षा घेतली जाते. या शिष्यवृत्ती योजनेत जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन बी पी एरंडे यांनी केले होते.
दरम्यान, या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे ग्रामीण विभागात लोणावळा व देहू रोड येथील शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवले होते. (Pune News) आणि लोणावळा व देहू रोड येथील परीक्षा केंद्रावर दिनदयाळ स्पर्श योजना शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली.
देहू रोड येथे परीक्षा संपन्न होण्यासाठी छावणी परिषद देहू रोड चे मुख्य कार्यकारी अधिकारी माने, केंद्रप्रमुख खान यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. (Pune News) यावेळी पोस्टमास्तर भारत गवळी, राम वायाळ , महेश टकले , अशोक गोफने इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. तर लोणावळा येथे पोस्टमास्तर मंगल गवळी, विवेक थोरवे, खोपडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये करवाई