Pune News : पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि वेगावर ताबा नसणे, या दोन प्रमुख कारणांमुळे महामार्गावर जीवघेणे अपघात होत आहेत. आता पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून जयसिंगपूरला जाणाऱ्या गाडीचा टायर फुटल्यामुळे भरधाव वेगात असलेली गाडी दुसऱ्या गाडीवर आदळून हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीचा चालक फरार झाला आहे.
सातारा शहराच्या हद्दीत झाला अपघात
या अपघातात निखिल शशिकांत चौखंडे (वय ३०), प्रियांका निखिल चौखंडे (वय २५) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. तसेच शशिकांत यदुनाथ चौखंडे (वय ६३) यांचाही या अपघातात मृत्यू झाला. सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहे. (Pune News ) या जिवघेण्या अपघातात चार जण जखमी झाले. त्यांना उपाचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कधी मानवी चुकांमुळे अपघात होतात. तर कधी नैसर्गिक आपत्ती उदभवते. अपघातात जीव गमवणाऱ्यांची संख्या देशात लक्षणीय असल्याचे निदर्शनास येत आहे. अपघात कमी करण्यासंदर्भात वारंवार चर्चा होत असते. (Pune News ) परंतु ठोस उपाययोजना होत नाहीत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. जखमींना जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून बाजूला करण्यात आले. या अपघातात टायर फुटलेली गाडी ज्या वाहनावर अडकली ते वाहन रस्त्यावर उभे होते. रस्त्यावरुन प्रवासी घेण्यासाठी ते थांबले होते. (Pune News ) या अपघातात जखमी झालेल्यांची नावे अद्याप मिळालेली नाहीत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पीएमपीएमएलच्या खासगी चालकांचा अचानक संप, प्रवाशांचे हाल..
Pune News : खराडी येथे नोकरीचे आमिष दाखवून ९ जणांची २५ लाखांची फसवणूक
Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या ; आरोपी अटकेत, खराडी परिसरातील घटना.