Shirur News : शिरूर, ता.१४ : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी पर्व असून घरावर तिरंगा झेंडा लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. हर घर तिरंगा या अभीयानांतर्गत जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात तिरंगा घरांवर दिमाखाने उभारला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत नागरिकांनी झेंडा उभारावा. असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. (Shirur News)
स्वातंत्र संग्रामातील क्रांतिकारक, स्वातंत्र संग्रामातील घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्रच्याची स्मृती तेवत राहावी. देशमभक्तीची जाज्वल भावना रहावी, इतीहासाचे अभिमानाने संस्मरण करण्याच्या उद्देशाने हर घर झेंडा हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. (Shirur News)
ध्वज संहितेचे पालन करा…
सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, शांळामध्ये तिरंगा ध्वज लावण्यात येत आहे. घरी व कार्यालयात ध्वज उभारताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामध्ये ध्वजाचा जमिनीशी संपर्क होऊ नये, ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नये. कोणतीही वस्तू देण्याचे, घेणायाचे बांधण्याचे किंवा वाहन नेण्याचे साधन म्हणून तसेच इमारतीचे आच्छादन म्हणून ध्वज वापरता येणार नाही. सन्मानपुर्वक ध्वज लावावा व 15 अॅागस्ट सायंकाळी सन्मानपूर्वक उतरवावा. (Shirur News)
प्लॅस्टिक व कागदी ध्वज वापरू नका…
नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लॅस्टिक व कागदी राष्ट्रध्वजचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे ध्वज मैदानात व रस्त्यावर पडलेले असतात. त्या मुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. हे टाळण्यासाठी कागदी व प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. अशे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.