Shirur News : शिरूर : “शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे ,शिक्षकांमधूनच केंद्रमुख भरती, आरोग्य कॅशलेस योजना ,विनाअट घरभाडे ,केंद्रप्रमुख भरतीसाठी ५० वर्ष वयाची अट रद्द करणे, बारावी विज्ञान पदवीधारकांना बीएससी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सवलत देणे, अशा विविध प्रश्न सोडविणार आहे. असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांनी दिली. Shirur News
विविध प्रश्न सोडविणार – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिरूर तालुक्यातील नाव्हरे फाटा येथे निसर्ग मंगल कार्यालयात शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या अधिवेशन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे हे होते. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रीय शिक्षक संघाचे महासचिव बाळासाहेब झावरे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मुख्यकार्यकरी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याबरोबर बैठक घेऊन मार्गी लावू. असे मारणे यांनी सांगितले आहे. Shirur News
दरम्यान, यावेळी शांताराम घोरपडे यांची म.रा.प्राथ शिक्षक संघाच्या सल्लागार पदी तर बाळासाहेब घोडे यांची राज्याचे संपर्कप्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. तर शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी संतोष गावडे तर महिला शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी नयना अरगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. Shirur News
यावेळी सरचिटणीस खंडेराव ढोबळे, राज्य सल्लागार शंकरराव लोखंडे, कार्याध्यक्ष पोपट निगडे, उपाध्यक्ष विकास शेलार, शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस राजेश राऊत, रमेश मारणे, धनंजय जगताप, पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी फडतरे, जुन्नर शिक्षक पतसंस्था माजी सभापती वैभव सदाकाळ, जुनी पेन्शन संघटनेचे शिरुर तालुका अध्यक्ष बबनराव म्हाळसकर, संतोष पानसरे, नवनाथ आडकर, विजय कोळपे , जिल्हा संघाचे कोशाध्यक्ष माऊली पुंडे, कार्यकारी अध्यक्ष उत्तम भंडारे, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब लांडगे,महिला आघाडी मा अध्यक्षा साधना शिंदे ,सूर्यकांत बढे, सुनील शेळके, दिपक सरोदे,उपस्थित होते. Shirur News
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष-संतोष गावडे
शिक्षक नेते-संतोष शेवाळे
सरचिटणीस-आप्पासाहेब रसाळ
कार्याध्यक्ष-राहुल घोडे
कोषाध्यक्ष-आबासाहेब जाधव
तालुका समन्वयक- रमेश उबाळे
संपर्कप्रमुख- हिरामण ढोकले
प्रसिद्धीप्रमुख- संतोष जाधव
प्रवक्ते- दत्ता घाडगे
कार्यालयीन चिटणीस- तानाजी पोखरकर
मिडिया प्रमुख- राजाराम सकट
मुख्यसंघटक- आशितोष खेडकर
विभागप्रमुख तळेगाव-सर्जेराव पाखरे
विभागप्रमुख पाबळ- रविंद्र खोसे
विभागप्रमुख-कवठे- बाबाजी हिलाळ
विभागप्रमुख सरदवाडी- संजय वाळके
विभागप्रमुख न्हावरे- नवनाथ काळे
महिला शिक्षक आघाडी कार्यकारिणी:
अध्यक्ष – नयना आरगडे
कार्यकारी अध्यक्ष – संगिता मंडले
शिक्षक नेत्या- मंगल घोरपडे
सरचिटणीस- सुनिता लंघे
कार्याध्यक्ष- मनिषा घावटे
कोषाध्यक्ष- जयमाला मिडगुले
तालुका समन्वयक- कुंदा निचित
संपर्क प्रमुख- सुमन भोगावडे
प्रसिद्धी प्रमुख- छाया गुंड
प्रवक्ते- सरीता शितोळे
कार्यालयीन चिटणीस- वैशाली थिटे
मिडिया प्रमुख- ज्योती गर्जे
मुख्यसंघटक- निलोफर तांबोळी
विभागप्रमुख तळेगाव- मनिषा भंडारे
विभागप्रमुख पाबळ- पल्लवी गायकवाड
विभागप्रमुख कवठे- ज्योती निचित
विभागप्रमुख सरदवाडी- नलिनी पाचार्णे
विभागप्रमुख न्हावरे- भारती भोसले
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघ सरचिटणीस कैलास पडवळ यांनी केले, तर आभार राज्य संघ उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी मानले.Shirur News